Email: info@hairtreatmentmumbai.com, Contact No.: +91 7028065165

Truth Behind Viral Message Of Tight Jeans Causes Infertility – Saamana

तमाम लोकांचा आवडता पोशाख कुठला तर त्यात बहुतांश उत्तरांमध्ये हटकून जीन्स या कपड्याचं नाव असेलच. जाडी भरडी असली तरी वापरायला सोयीची, वेळ वाचवणारी आणि मुख्य म्हणजे न धुता वापरता येणारी. तिच्या या ‘गुणधर्मां’मुळे आबालवृद्धांमध्ये जीन्स हा आवडता पेहराव आहे. पण, या जीन्सच्या सतत वापराचेही काही दुष्परिणाम आहेत. त्वचेच्या संसर्गापासून ते वंध्यत्वापर्यंत अनेक आजारांचे मूळ या जीन्समध्ये असल्याचा एक मेसेज सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

या व्हायरल झालेल्या मेसेजनुसार, जीन्स ही शरीराच्या आकाराची असल्याने ती शरीरावर घट्ट बसते. त्यामुळे सतत घाम साचून जननेंद्रिय आणि आसपासच्या भागाला फंगस म्हणजे बुरशीच्या त्रासाला सामोरं जावं लागू शकतं. खाज, जळजळ होणं, पोटावर आवळलेल्या पँटमुळे अॅसिडीटी होणं, मूळव्याध अशा आरोग्याच्या अनेक समस्यांना जीन्स आमंत्रण देते. पुरुषांच्या बाबतीत तर ही मोठी समस्या असून त्यामुळे शुक्रजंतूंवर परिणाम होऊन वंध्यत्वही येऊ शकतं असं या मेसेजमध्ये म्हटलं आहे. वंध्यत्वाला निमंत्रण असल्याचं या मेसेजमध्ये म्हटल्यामुळे अनेक जीन्सप्रेमी चांगलेच धास्तावले आहेत.

जीन्सच्या दुष्परिणामांबाबत वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्टीकरण दिलं आहे. द अस्थेटिक्स क्लिनिक्सच्या त्वचाविकार तज्ज्ञ डॉ. रिंकी कपूर यांच्या म्हणण्यानुसार, बाल्यावस्थेतील अथवा कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुली अथवा आयटी सेक्टरमध्ये काम करणारे सर्व हे बरेचदा अतिशय घट्ट कपडे घालत असल्याचे आपण पाहतो. आठवडयातून 4-5 दिवस अशा प्रकारचे वस्त्र घालत असल्याने खाजगी जागेवर त्वचेचा संसर्ग, योनीमार्गात दुखणे अथवा संसर्ग होणे अशा बऱ्याच समस्या घेऊन रुग्ण येत असतात. सिंथेटिक किंवा नायलॉनपासून बनलेले जाड कापड सर्रास परिधान केल्याने शरीरात जी उष्णता निर्माण होते ती बाहेर जाण्यास मार्ग नसल्याने जांघेत अथवा खाजगी जागेत घाम जमा होऊ शकतो आणि त्यामुळे त्वचेचा संसर्ग होऊ शकतो. पंरतु, या संदर्भात विशेष अशा काही संशोधन झालेले नाही. त्यामुळे महिलांमध्ये वंधत्वाबाबत तरी काही समस्या निर्माण होत नाही कारण गर्भधारणा होणे ही प्रक्रिया अंतर्गत आहे आणि अशा घट्ट कपडयामुळे त्यांना काही हानी पोहचत नाही. मात्र, पुरुषांना याचा त्रास होऊ शकतो आणि त्यांच्या स्पर्म काऊंटवर परिणाम होऊ शकतो. याबाबत अनेक संशोधनं प्रसिद्ध झाली आहेत. म्हणून अशाप्रकारच्या कपडयांचा अतिरेक टाळावा व आपले ट्रेडिशनल वस्त्र परिधान केल्यास अशा कोणत्याही समस्या उद्धभवणार नाहीत असं डॉ. कपूर यांचं म्हणणं आहे.

स्त्रियांना येणाऱ्या समस्यांबाबतीत वॉक्हार्ट रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. गंधाली देवरुखकर-पिल्ले यांच्या म्हणण्यानुसार, बहुतांश स्त्रिया जी अंतर्वस्त्रं वापरतात त्यात नायलॉन किंवा लायक्रा अशा कापडांचा वापर होते. त्यामुळे घाम जिरत नाही आणि संसर्ग होऊ शकतो. ज्या महिला शरीराच्या आकारापेक्षा तीन सेंटिमीटर कमी घेराच्या जीन्स वापरतात त्यांना योनीमार्गातून स्त्राव जाण्याच्या तक्रारी उद्भवतात, तसेच पोटात पित्त साचून वेदना होतात, असं डॉ. गंधाली पिल्ले यांनी स्पष्ट केलं आहे.

Article Source – https://www.saamana.com/truth-behind-viral-message-of-tight-jeans-causes-infertility/